भोर : तालुक्यात काल रात्री वनविभागाने सागवान, रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांच्या लाकडांची तस्करी करणाऱे दोन ट्रक ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर कारवाईत जप्त करण्यात आलेला माल हा लाखांच्या घऱात असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी भोर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान आणि रायवळ लाकूड साठवले होते. या लाकडाची अंदाजे लाखोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने पुढील तपास सुरू केला असून, तस्करीमध्ये संलग्न असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे. तसेच या तस्करीमध्ये वापरण्यात आलेले दोन्ही ट्रक तालुक्यातील बड्या नेत्याचे असल्याची बोलले जात आहे.
लाकूड तस्करीपुरते मर्यादित नसून, त्याचा पर्यावरणावर देखील परिणाम असल्याचे जाणकार सांगतात. सागवान आणि रायवळ ही दुर्मिळ झाडे असून या झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली असल्याची माहिती आहे. हे पर्यावरणासाठी धोकादायक आहे. यामुळे आता या प्रकरणात वनविभाग काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.